सध्या साऱ्या भारतामध्ये नरेंद्र मोदींच्या पर्यायाने भाजपाच्या च्या विरोधात अनेक विरोधी पक्ष देश पिंजून काढत आहेत, त्यामुळे जे हाडाचे भाजपा कार्यकर्ता आहेत त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. अश्यातच दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या बडोद्याहून भाजपाचे कार्यकर्ते गोपाळ गोहिल यांचा फोन आला, मोदींनी सुद्धा हसत मुखाने त्या स्वीकारल्या. परंतु गोपाळजींनी एक चिंता मोदींना बोलून दाखवली कि देशात नकारात्मक वातावरण तयार केले जात आहे, त्यावर नरेंद्र मोदींनी अतिशय सुंदर उत्तर दिले कि, आपलं आयुष्यच असंच आहे, अनेकदा अनेक प्रकारचे आरोप आजवर माझ्यावर लावण्यात आले, आरोप करणे त्यांचं काम आहे न्याय देणे जनतेचं काम आहे, जोवर सेवेची संधी देतील तो वर सेवा करायची. मोदींचे हेच दिलखुलास बोलणे भाजपा साठी नवसंजीवनी ठरत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews